• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

ByEditor

Dec 24, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे ठेकेदाराबरोबर असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे दुर्लक्ष होत असल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले चित्र पहावयास मिळत आहे.

उरण शहरातील कचरा गोळा करण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला आहे. परंतु ठेकेदार मुख्य रस्त्यावरील कचरा उचलून मैदानावरील कचराचा साठा तसाच ठेवला जातो. याबाबत मुख्याधिकारी समीर जाधव व आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असते. तसेच कचरा गोळा करणारी गाडी कधी पण येत असल्याने दुकानदार आपला कचरा रस्त्यावर किंवा अडगळीत टाकून मोकळे होतात. त्याचबरोबर कचरा गोळा करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपकरणे प्रामुख्याने हँडग्लोव्हस, गमबुट, मास्क न लावता काम करीत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. ठेकेदार नगरपालिका अधिकारी वर्गांशी साटेलोट करून आपले बिल काढीत आहे. त्यामुळे शहरातील जनतेचे व कचरा गोळा करणारे कामगार वर्ग यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना आजाराने ग्रासले आहे.

वीर सावरकर मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य असून असेच चित्र शहरातील अनेक भागात पहावयास मिळत आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गाकडे वारंवार तक्रारी करूनही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी व कचरा उचलणारे ठेकेदार जनतेला फाट्यावर मारीत त्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याने जनतेत संतापाची लाट पसरली आहे. याबाबत वरिष्ठांनी नोंद घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी शहरातील जनतेकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!