• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आंबेवाडी नाक्यावर जंगी स्वागत

ByEditor

Dec 24, 2024

विश्वास निकम
कोलाड :
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदान संघातील नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांची मंत्री मंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली परंतु खाते वाटप २१/१२/२०२४ रोजी उशिरा करण्यात आले. यावेळी आमदार आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा महिला व बालविकास खाते मिळाल्यानंतर आदिती तटकरे यांचे आंबेवाडी नाक्यावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, माजी सरपंच सुरेश महाबळे, कुमार लोखंडे, गणेश वाचकावडे, श्रीकांत चव्हाण, महेश वाचकावडे, शैलेश सानप, संजय मांडलुस्कर, निशिकांत पाटील, अविनाश पलंगे, जगन्नाथ धनावडे, बंडया राजीवले, प्रफ़ुल बेटकर, महेश लोखंडे, अजय कापसे, शिवाजी सानप, मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका तसेच कोलाड खांब परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते पुन्हा मिळाल्याने लाडक्या बहिणींच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आदितीताई यांच्या कुशल नेतृत्वामुळे लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, यामुळे कोलाडमध्ये आदिती तटकरे यांचे आगमन होताच त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!