• Wed. Apr 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

ByEditor

Dec 26, 2024

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.

विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले.

मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तर ते 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!