सलीम शेख
माणगाव : पुणे-दिघी महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टरला पाठून ठोकर लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाल्याची घटना दि. ३१ डिसेंबर रोजी घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ३१ डिसेंबर रोजी ८.४० वा. च्या सुमारास मयत दुर्गेश काशीनाथ हंबीर याने त्याचे ताब्यातील स्कुटी क्र. एमएच ०६ सीई ०६५२ ही निजामपुर ते माणगांव रोडने अतिवेगाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवित असताना महेंद्र सिंग यांचे दुकानासमोरील निजामपुर माणगांव रस्त्याचेकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्रं. केए. २८ टीई ३४१० याचे पाठी मागील बाजुच्या ट्रॉलीस ठोकर मारुन अपघात केला. या अपघातात दुचाकीस्वार दुर्गेश हंबीर याचा मृत्यू झाला असून निकेश किशोर बांगारे याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.