• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारला

ByEditor

Jan 2, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना खुर्चीवर बसवत त्यांचे केले स्वागत

अमुलकुमार जैन
रायगड :
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. तर महायुतीकडे मोठ्या प्रमाणात बहुमत असल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा समावेश आहे. 17 दिवस उलटून गेल्यानंतरही बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्याची जबाबदारी स्वीकारली नाही, मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सर्व मंत्र्यांना लवकरात लवकर खात्याचा पदभार स्वीकारावा असे आदेश दिले.

आज महाड, माणगाव, पोलादपूरचे आमदार तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयातील विस्तार इमारत तिसरा मजल्यावरील दालन क्रमांक 314, 316, 318 या कार्यालयाचा पदभार यावेळी स्वीकारण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांना स्वतः खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय शिरसाठ, मंत्री दादा भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर तसेच इतर मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार भरतशेठ गोगावले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला तसेच इतर उपस्थित मंत्र्यांचा देखील नामदार गोगावले यांच्याकडून यावेळी सन्मान करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!