प्रतिनिधी
रायगड: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे.
सर्व परवानाधारक / वाहनचालक यांनी दि. १ जानेवारी २०२५ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावीत असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण महेश देवकाते यांनी कळविले आहे.