• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भारतात आढळला ह्युमन मोटान्यूनोचा पहिला रुग्ण; 8 महिन्यांच्या लहान बाळाला लागण

ByEditor

Jan 6, 2025

बंगळुरू : 2025 सालात चीनमध्ये नव्या व्हायरसच्या हाहाकाराची बातमी आल्यानंतर संपूर्ण जगाने पुन्हा धसका घेतला. कोरोनानंतर आता चीनमधील नवा व्हायरसही जगभर पसरून नवीन महासाथ येते की काय अशी भीती वाटू लागली. आता ही भीतीही खरीच ठरते की काय असं वाटू लागलं आहे. कारण चीननंतर भारतातही HMPV आढळून आला आहे. भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला आहे.

कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या लहान बाळाला HMPV ची लागण झाली आहे. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती दिली आहे. लहान बाळाचा कोणताही प्रवास इतिहास नाही. म्हणजे त्याने कुठेही प्रवास केलेला नाही.

हा व्हायरस चीनमध्ये थैमान घालणारा व्हायरसच आहे की दुसरा कोणता प्रकार हे अद्याप माहिती नाही. अद्याप नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी. पुण्याच्या या संस्थेला नमुने पाठवण्यात आले नाहीत. हा व्हायरस चीनमध्ये थैमान घालणारा व्हायरसच आहे की दुसरा कोणता प्रकार हे अद्याप माहिती नाही. अद्याप नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी. पुण्याच्या या संस्थेला नमुने पाठवण्यात आले नाहीत.

दरम्यान हा व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितलं की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल HMPV आणि सीझनल इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे.

हा विषाणू काय आहे आणि तो माणसांसाठी किती धोकादायक आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्ली एनसीआरमधील प्रसिद्ध हॉस्पिटल मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. शरद जोशी यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा नवीन विषाणू नाही. पण दावा केला जात आहे की त्याच्या नवीन व्हेरियंटने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे.

डॉ. शरद जोशी यांनी सांगितलं की, सर्व विषाणू तुमच्या फुफ्फुसांशी संबंधित आहेत किंवा श्वसनाशी संबंधित आहेत. या सर्वांची पहिली लक्षणं म्हणजे नाक बंद होणं, घसा बसणं, खोकला किंवा शिंका येणं. ताप आणि शरीर थकवा ही त्याची लक्षणे आहेत. कोरोनामध्ये दिसल्याप्रमाणे, लोकांनी याामध्ये चव गमावली आहे. शिवाय लोकांना वास ओळखता येत नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!