• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती!

ByEditor

Jun 12, 2025

गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात झालेला आहे. अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आलेले आहे. अपघाताची घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. अपघातग्रस्त विमान प्रवासी वाहतूक करणारं आहे. त्यात किती प्रवासी आहेत, याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. रहिवासी भागात विमानाला अपघात झाला आहे.

अहमदाबादमधून विमानानं उड्डाण करताच अपघात झाला. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण २४२ जण असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. अहमदाबाद विमानतळावरुन विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळात मेघानीनगर परिसरात विमानाला अपघात झाला.

मेघानीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर दूरवर आहे. अपघात होताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे. सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमानाला अपघात होताच आग लागली. धुराचे लोट आसमंतात दिसू लागले. आपत्कालीन यंत्रणा सध्या अपघातस्थळी पोहोचलेल्या आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मेघानीनगर परिसराजवळ असलेल्या धारपूरमध्येही धुराचे लोट दिसत आहेत.

अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचं आहे. बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान ११ वर्षे जुनं असल्याची माहिती समोर आलेली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानानं पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. आग काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे. अपघातात विमानाचा एक पंख तुटला आहे. तो विमानापासून वेगळा झाला आहे.

अपघातात विमानाचं मोठं नुकसान झालेलं आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून भस्मसात झाला आहे. विमानानं एका इमारतीला धडक दिली. त्या इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विमानतळाजवळच रुग्णालय आहे. तिथल्या सगळ्या डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश देण्याच आलेले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!