क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे (२०२४-२०२५) आयोजन सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पेण येथे करण्यात आले आहे.
दि. २८ डिसेंबर रोजी सर्व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकरणीचे सदस्य, आश्रयदाता सदस्य, तहयात सदस्य, सामान्य सदस्य, सर्व क्लब व अकॅडमीचे सदस्य व माजी खेळाडू यांना सदरच्या सभेस उपस्थित राहण्यासाठी नोटीसद्वारे कळविण्यात आले असून काही सदस्यांना नोटीस मिळाली नसल्यास या प्रसिध्दी माध्यमाद्वारे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील क्रिकेट खेळाच्या विकास व विविध वयोगटातील स्पर्धेचे आयोजन करण्याविषयी चर्चा कारणे तसेच जिल्ह्यातील क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय ह्या सभेत घेतले जाणार असल्याची माहिती आरडीसीएचे सचिव प्रदिप नाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.