मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
कर्जत तालुक्यातील कडाव येथील येथील घटना
विशेष प्रतिनिधी
रायगड : कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. केंडे यांनी तक्रारदार यांचेकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता एक लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, दि. ८ जानेवारी रोजी त्यांना रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांना अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे मौजे दहिगाव तालुका कर्जत येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता दि. 31/12/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक चंद्रकांत ठकाजी केंडे (रा. नित्य चंद्रदर्शन हाऊसिंग सोसायटी, नागोठणे, तालुका – रोहा, जिल्हा – रायगड), मंडळ अधिकारी कडाव यांनी 1 लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दि. 7/1/2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 8/1/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक चंद्रकांत ठाकाजी केंडे यांनी तक्रारदार यांचेकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता एक लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. 8/1/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारताना स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर, सागर पाटील यांनी केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग कार्यालय दुरध्वनी (02141-222331)/ टोल फ्रि क्रं. 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pen Urban Co Op Bank has been sealed since 2010.
We are all aware who all were involved in the massive haul of 750 Crs.
Sagharsh Samiti of members faught tooth and nail.
Despite clear verdict by MIPD cou
rt in 2010, the members were deprived of justice.
On 3rd December, ED withdrew it’s stay in Supreme Court of India so members were delighted.
But same currupt system of Civil Servents is creating bigger obstacles so again members are taken aback.
Starting from Collector Raigad ,his partners in crime have started collecting Rs 5000/-from uneducated members. Where is Justice?