• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नाईट शिफ्ट संपवून घरी निघाल्या अन् तितक्यात भरधाव कारची धडक; 2 तरुणींचा मृत्यू

ByEditor

Jan 13, 2025

नवी मुंबई : कामावरुन घरी परतणाऱ्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती खोकले आणि अंजली पांडे अशी दोन्ही तरुणींची नावे आहेत. दोघीही एका खासगी कंपनीत कामाला होत्या. कंपनीत नाइट शिफ्ट करुन त्या घरी परतात होत्या. दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यातच दोघींचा मृत्यू झाला. कामोठ्यात राहणारी २२ वर्षीय संस्कृती खोकले आपली मैत्रीण १९ वार्षिय अंजली पांडे हीला बोनाकोड्यातील घरी सोडण्यासाठी जात होती. कोपरी पुला खालील सर्विस रोड वरून बोनकोड्यात जात असताना स्कोडा गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, त्यातच दोघींचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरुन जात आलेल्या मुलींनी राँग साईटने आल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटंल आहे. एपीएमसी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!