मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली नव्हती. आता नुकताच पालकमंत्र्यांच्या नावाची यादी ही जाहीर करण्यात आलीये. अनेकांची वर्णी लागली आहे तर संतोष देशमुख प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलाय. यासोबतच अनेक नवीन चेहऱ्यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालीये.
राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती.
अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रिपद असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत.
अशी आहे यादी…



