प्रतिनिधी
नागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने नियमित कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ३५ विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

यासाठी महाविद्यालयातील कु. साहिल घरत, कु. सानिका घासे, कु. सुमित घासे, कु. भार्गव, कु. तेजल डाकी, कु. श्रुती बोरकर, कु. प्रतिक्षा आदींसह विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख डॉ. राणी ठाकरे यांनी हे शिबीर यशस्वीपणे पार पाडले. या प्रसंगी प्रा. डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. आक्रोश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.