• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत पेण तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी

ByEditor

Feb 5, 2025

विनायक पाटील
पेण :
नुकत्याच पनवेल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट असोशिएशनने सेन्ट अँडरुस इंटरनॅशनल स्कूल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट फेडरेशन कपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पेण येथील रविंद्र म्हात्रे (पप्पु सर), आदित्य तेरेदेसाई, विनायक पाटील, प्रथमेश मोकल यांच्याकडे प्रशिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थांनी 21 गोल्ड मेडल, 16 सिलव्हर मेडल आणि 3 ब्रांझ मेडल पटकावले. त्यांच्या या घवघवीत यशामुळे पेण तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

स्पर्धेची विजयाची ट्राफी महाराष्ट्र युनिफाईटचे अध्यक्ष मंदार पनवेलकर ह्यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी आयोजक निलेश भोसले, रायगड युनिफाईट असोशिएशनच्या सचिव स्मिता पनवेलकर, तसेच युनायटेडचे प्रसार प्रचार प्रमुख व प्रशिक्षक प्रतिक कारंडे सर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा युनिफाईटचे रेफरी पॅनल व सहकारी यांनी मोलाचे काम पाहीले. या स्पर्धेत पनवेल महापलिका खांदा कॉलनी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी तर पनवेल ग्रामीण हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला व उत्कृष्ट टीम म्हणून सूकापुरच्या टीमला सन्मानित करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!