• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव नगरपंचायतची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई

ByEditor

Feb 5, 2025

मजित हजिते
माणगाव :
माणगाव बाजारपेठमधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतने धडक मोहीम राबविली आहे. पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायतने ही कारवाई बेधडकपणे राबवली आहे. माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर आले आहेत.

माणगाव बाजारपेठेमध्ये गेले काही वर्ष वाहतूक कोंडी आणि फुटपाथवर अतिक्रमण हा प्रश्न गंभीर बनला होता. फुटपाथवर वाढलेल्या व्यवसायिकांनी पादचारी मार्ग अडवले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत माणगाव नगरपंचायतच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवली. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी माणगाव नगरपंचायतने हे अतिक्रमण हटवण्याची सुरुवात केली. यावेळी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिक्रमण विरोधी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. मात्र ही कारवाई तात्पुरती आहे की काही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत हा प्रश्न उद्भवत आहे, कारण या आधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली होती. ही कारवाई दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहेत हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!