भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
सलीम शेख
माणगाव : दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख सुधीर म्हामुणकर, साई पंचायत समिती गण प्रमुख संतोष कळंबे यांच्या समवेत रसिका राजेंद्र कळंबे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पेण/तळे, नामदेव ताम्हणकर उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत पेण /तळे, विजय पेणकर माजी उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत पेण तळे, संतोष कळंबे, ग्रामपंचायत सदस्य पेण/तळे, नयन पोटले सामाजिक कार्यकर्ते, दत्तारामजी वडेकर, माजी अध्यक्ष पेण गाव, गणेश वडेकर, युवानेते अनिल लाड, दत्ताराम सुतार, नारायण मांगले, सुरेश मांगले, लक्ष्मण दिवेकर, दिनेश वडेकर, सुनील भोसले, सुभाष काळप, रमेश जाधव, सचिन जाधव, मंगेश वडेकर, महादेव बंगाल, किशोर पोटले, केशव मोंडे, सचिन लाड, मधुकर म्हामुणकर, शैलेश म्हामुणकर, महादेव पेडणेकर, बापु पेडणेकर, राजेंद्र सकपाळ, भोलानाथ खिडबिडे, हेमंत ईप्ते, सचिन काशीम, मधुकर वडेकर, रामचंद्र पेणकर, अनिल वाघरे, प्रकाश मोहे, संतोष काळप, अनिल पारधी, रवींद्र भावे यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार प्रशांत ठाकूर, लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे सहकार आघाडी गिरीश तुळपुळे, श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे, सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील, माणगांव तालुका अध्यक्ष गोविंद कासार व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अलिबाग येथे जाहीर पक्षप्रवेश केल्याचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले.

या पक्षप्रवेशामुळे साई पंचायत समिती गणामध्ये भाजपा निर्णायक भूमिकेमध्ये आली असून तळाशेत जिल्हा परिषद मतदार संघावर दिवसेंदिवस भाजपाची पकड मजबूत होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या मतदार संघामध्ये भाजपा युवानेते निलेश थोरे यांना आ. रवींद्र चव्हाण यांनी विशेष जबाबदारी दिली असल्याचे समजत असून त्यांच्याच वरदहस्ताने भाजपा ग्रामीण भागात रुजत असल्याचे दिसत आहे. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पूर्ण ताकदिनीशी भागाचा विकास करणार असल्याचे वचन दिले आहे.