• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये शिंदेसेनेत धुसफूस, तालुकाप्रमुखांच्या पदाला जिल्हाप्रमुखांची स्थगिती

ByEditor

Feb 21, 2025

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात शिंदे गटातील नाराजी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुकाप्रमुख पदाला जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी स्थगिती दिल्याने हा वाद समोर आला आहे. प्रोटोकॉल तोडून आढावा बैठक बोलावल्याने जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ही कारवाई केली आहे. गुरुवार २० फेब्रुवारी रोजी मुरुड येथे झालेली आढावा बैठक प्रोटोकॉल मोडून आयोजित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिंदेसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजन केणी यांनी मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांच्या पदाला स्थगिती देऊन आपली नाराजी स्पष्ट केली आहे.

मुरुडमध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांशी संवाद, आभार आणि आढावा बैठकीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हा प्रमुख आणि महिला संपर्क प्रमुख यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. पण या बैठकीमध्ये राजा केणी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा ठपका जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी डोंगरीकर यांच्यावर ठेवत त्यांच्या मुरुड तालुका प्रमुख पदाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

काही दिवसांपूर्वी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी आणि दिलीप भोईर यांच्यामधील जवळीक पाहून राजा केणी यांनी आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली होती. आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक म्हणून राजा केणी यांची ओळख आहे. राजा केणी यांनी विधानसभा निवडूक प्रचारात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र दिलीप भोईर आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी आणि दिलीप भोईर यांच्यामधील जवळीक पाहून राजा केणी यांनी आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली होती. दरम्यान अंतर्गत वाद समोर आल्यावर आमदार महेंद्र दळवी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!