• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांना मातृशोक

ByEditor

Mar 2, 2025

घन:श्याम कडू
उरण :
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जेएनपीएचे ट्रस्टी दिनेश पाटील यांच्या मातोश्री मनोरमा काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. जसखार येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मनोरमा पाटील या जसखार गावातील प्रतिष्ठित पाटील घराण्यातील होत्या. त्या उच्चशिक्षित होत्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबासह समाजातील अनेकांना मार्गदर्शन करून शिक्षणाच्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरित केले. घरी येणाऱ्या प्रत्येकाचे आपुलकीने स्वागत करून त्यांचा मानपान करणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. त्यामुळे त्या सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकल्या. पती काशिनाथ पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंब एकसंघ ठेवले. अशी ही सर्वांना आपलेसे करणाऱ्या माऊलीला काळाने आज हिरावून घेतली.

त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार, ११ मार्च रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर, केगाव येथे सकाळी ८ वाजता तर दिवसकार्य बुधवार दि. १३ मार्च रोजी राहत्या घरी जसखार येथे होणार आहे. याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नसल्याचे पाटील कुटुंबियांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!