क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या वरिष्ठ महिलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. महाडच्या काजल साळुंकेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याचा महिलांचा संघ पुढील प्रमाणे :
काजल साळुंके (कर्णधार), श्रुती देसाई (उपकर्णधार), संस्कृती पालकर, अनिष्का वर्मा, तनश्री सावंत, अपेक्षा पवार, अनिषा कांबळे, अपर्णा गायकवाड, अमिषा बामणे, त्रिशा जामवल, गार्गी साळुंके, श्रुती अडित, साची बेलोसे, वेदिका तेटगुरे.
राखीव खेळाडू : इच्छा यादव, आरुषी जाधव,स्वरा भगत, मधुरा बाबर, आर्या शेंडगे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वरीष्ठ महिलांचा सराव सामना पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घेण्यात आला व पनवेल कामोठे येथील रोशन क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव शिबिर आयोजित करण्यात आले. ह्या प्रक्रियेतून अंतिम संघ निवडण्यात आला. निवडकर्ता म्हणून देवा पाटील, सुयोग चौधरी, सागर कांबळे यांनी काम पाहिले, तर प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून निवड प्रक्रियेमध्ये नयन कट्टा यांनी सहभाग घेतला. संघाच्या व्यवस्थापक म्हणुन कु. दिप्ती म्हात्रे, अलिबाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील, यशवंत साबळे, सहसचिव जयंत नाईक, महिला क्रिकेटच्या प्रमुख आदिती दळवी, सदस्य प्रदीप खलाटे यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.