अमुलकुमार जैन
रायगड : महाड येथील चवदार तळे येथे सतिश बाबु कुरूणकर,(वय- ५१, रा. करंजखोल वरचा कोंड ता. महाड, जि. रायगड) याचा तोल जाऊन मृत्यू झाला असल्याची फिर्याद अनिल गुलजारी चव्हाण (वय- ५०, सध्या रा. लाडवली मैत्री पार्क ता. महाड, जि. रायगड) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत सतीश कुरुणकर हा इसम महाड शहरांतील भाजी मंडई रोड समोरील चवदारतळे येथील सिमेंटच्या कठड्यावर पाठ टेकुन उभा होता. त्यावेळी त्याचा तोल जावुन तो चवदार तळ्याच्या पाण्यात पडुन बुडाल्याने मयत झाला. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार करीत आहेत.