• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटात स्विफ्ट कार व एसटी बसमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू

ByEditor

Mar 5, 2025

सलीम शेख
माणगाव :
ताम्हिणी घाटामध्ये स्विफ्ट कार व एसटी बसमध्ये अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ४ मार्च रोजी दु.१:१५ वाजता घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, माणगावहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खेड चिंचवड एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल २७७१ व पुण्याच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार (क्र. एमएच १२ एनयु ६७३१) मध्ये ताम्हिणी घाटातील मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत अपघात झाला. हा अपघात तेवढा भीषण होता की, स्विफ्ट कारचा समोरच्या बाजूचा पूर्णपणे चकाचूर झाला आहे. या अपघातात स्विफ्ट कारमधील दोन प्रवासी मानस कुमार निरंजन साहू (वय ३८, रा. पौड) व सखुबाई तुकाराम कानवडे (वय ६५, रा. मुळशी पुणे) यांचा मृत्यू झाला. तसेच पाठी बसलेले तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये रूपाली मानस साहू (वय २८), ताराबाई बाळू नलावडे (वय ४५) व रमा मानस साहू (वय ७) हे जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेस्कु टीमसह माणगाव पोलीस घटना घडली दाखल झाले. जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!