• Thu. Apr 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

समृद्धीवर महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १५ जणांचा मृत्यू, बचावकार्यासाठी NDRF दाखल

ByEditor

Aug 1, 2023

शहापूर : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. आतापर्यंत १५ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे. हे अद्याप अस्पष्ट आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यत १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतीांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!