अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यात एका 33 वर्षीय विवाहित महिलेची साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत विनयभंग केला असल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी आरोपी विरोधात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात दि. ३१/०३/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पीडित महिला ही मच्छिसाठी बर्फ घेवुन घराकडे येत असताना तिच्या मागे त्याच गावातील आरोपी आला व त्याने साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गु.रजि.नं. ५८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७५,७६,७९ प्रमाणेदाखल गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक शिंदे या करीत आहेत.