प्रतिनिधी
पोयनाड : दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा महाराष्ट्र शासन महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड मार्फत कार्यालयाच्या मोकळ्या जागेत व झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणा लगत वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या वृक्षांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याचा संकल्प ह्यावेळी मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड मार्फत करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी पोयनाडचे मंडळ अधिकारी महेश निकम, झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर बुराण, मनोज वाडकर तलाठी सजा श्रीगाव, दयानंद सूर्यवंशी तलाठी सजा रावेत, हेमंत चांदोरकर तलाठी सजा पेझारी, आर. एन. पाटील तलाठी सजा पोयनाड, अर्चना राऊत, देवेंद्र ओव्हाळ, विजय पाटील, राजेंद्र बिबवेकर, रमेश नांदगावकर, रोशन पाटील कोतवाल व कर्मचारी मंडळ अधिकारी पोयनाड, झुंझारचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सदस्य अजय टेमकर, ऍड. पंकज पंडित यांच्यासह पोयनाड विभागातील नागरिक उपस्थित होते.