• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण पनवेल रोडवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

ByEditor

Aug 1, 2023

उरण पनवेल मार्ग बनलाय मृत्युचा सापळा

विठ्ठल ममताबादे
उरण:
उरण पनवेल मार्ग हा मृत्युचा सापळा बनला असून या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असतात. अनेक मोठया अपघातात अनेकांचे जीव गेलेले आहेत. अशाच एक अपघात दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा येथे घडला आहे. या अपघातामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. उरण पनवेल रोडवरील गव्हाण ब्रिजवर भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून, यामध्ये एक प्रवासी मृत्युमुखी पडला आहे.

पनवेलवरून उरणच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला ट्रेलरने धडक दिल्याने उरण पनवेल मार्गावरील गव्हाण ब्रिजवर भीषण अपघात घडला. ईको गाडीमध्ये पाच प्रवासी बसले होते. यामध्ये ड्रायव्हर व इतर प्रवासी वाचले असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले तेलंगे नावाचे प्रवासी यांचा मात्र मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, असे अपघात घडून मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नसून या मार्गावर वाहनांचे वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गांनी प्रशासनाकडे केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!