• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, अदिती तटकरे यांची माहिती

ByEditor

May 2, 2025

मुंबई : लाडकी बहिण योजनेंतर्गत आजपासून एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हप्ता उशीरा मिळण्याचे कारण काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिनाअखेरीस २५ तारखेपर्यंत पैसे मिळतात. एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे. यातच अदिती तटकरेंनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!