मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in द्वारे तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर मंगळवारी 13 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in, mahresult.nic.in वर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील.
या वेबसाइटवर पाहता येईल निकाल (SSC Result 2025 )
१. http://www.mahresult.nic.in
दहावी परीक्षा 2025 चा निकाल ऑनलाइन असा तपासा (How to check maharashtra 10th result)
- अधिकृत वेबसाइटवर mahahsscboard.in, mahresult.nic.in ला भेट द्या
- मुख्यपृष्ठावर महाराष्ट्र SSC निकाल 2025 तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा.
- समोर दिलेल्या जागेत आवश्यक लॉगिन तपशील भरा.
- महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल.
- सर्व तपशील तपासून घ्या आणि निकाल डाउनलोड करा
निकाल SMS द्वारे तपासण्याची प्रक्रिया
- तुमच्या स्मार्टफोनमधील मेसेजिंग अॅप उघडा.
- मेसेजमध्ये MHSSC <स्पेस> तुमचा सीट क्रमांक टाइप करा. (उदा: MHSSC S123456)
- मेसेजमध्ये MHHSC <स्पेस> तुमचा सीट क्रमांक टाइप करा. (उदा: MHHSC H789012)
- तयार केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.
- काही क्षणांत तुम्हाला तुमच्या निकालाची माहिती SMS द्वारे प्राप्त होईल.
विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्याच्या टिप्स
- निकाल तपासण्यापूर्वी तुमचा सीट क्रमांक आणि इतर तपशील तयार ठेवा.
- निकाल जाहीर झाल्यावर वेबसाइटवर गर्दी होऊ शकते, त्यामुळे वेळ लागू शकतो.
- अशा परिस्थितीत SMS सेवा हा जलद पर्याय आहे, तुम्ही एसएमएस करून निकाल पाहू शकता.
- निकाल मिळाल्यानंतर तुमच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करून ठेवा.
