• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पंच प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे आयोजन

ByEditor

Jun 1, 2025

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी मार्गदर्शन शिबिराचे व त्यानंतर पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर १०० दिवसांचे असून प्रत्यक्ष कार्यशाळा शिबिर व ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिरानंतर पंचांची लेखी व प्रॅक्टिकल स्वरूपात परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये घेतली जाणार आहे.

प्रशिक्षण शिबिरासाठी तज्ञ प्रशिक्षक म्हणून माजी रणजीपटू व विद्यमान बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, एमसीएचे पंच राजन कसबे व क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा हे मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक ५ जूनपर्यंत इच्छुक पंचांनी गुगल फॉर्मद्वारे आपली नोंदणी करावी असे आवाहन आरडीसीएच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व वयोगटातील मुलामुलींच्या स्पर्धेसाठी पंच व गुणलेखकांची नेमणूक हि प्रशिक्षित व परीक्षा दिलेल्या व्यतींचीच करण्यात येणार आहे. प्रशिक्षण व परीक्षा न देणाऱ्या लोकांचा विचार सामन्यासाठी होणार नसल्याचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. नोंदणी विषयी अधिक माहितीसाठी सहसचिव जयंत नाईक – ९५६१०९९७३५, सदस्य ॲड. पंकज पंडित – ८१४९२५२८२९, प्रदीप खलाटे – ८७६७९५९९६२ यांच्याशी संपर्क साधावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!