• Sat. Jun 7th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुण्यात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अनय गाडगेचा पदकांचा ‘चौकार’

ByEditor

Jun 6, 2025

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील रोठखुर्द येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अनय रोहित गाडगे याने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार पदके पटकावली. यामध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाचा समावेश आहे.

अनय गाडगे याने पुणे येरवडा येथे विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी होत १२ वर्ष वयोगटात घवघवीत यश संपादन केले. त्याने २०० मी. आयएम, ५० मी. फ्री स्टाईल, ५० मी. बटरफ्लाय या तीन प्रकारात सुवर्णपदक, तर ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक प्राप्त केले. अनयला प्रशिक्षक भूषण शिर्के व भूषण म्हात्रे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुळे, उपमुख्याध्यापक श्री. माने यांच्यासह शाळेचे शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी या सर्वांनी अनयचे अभिनंदन केले. त्याने केलेल्या या कामगिरीमुळे यापुढेही आम्ही त्याला प्रोत्साहन देत राहू असे अनयच्या आई, वडिलांनी सांगितले, तर राज्यस्तरीय स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल उत्साह निर्माण झाल्यामुळे यापुढेही होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यशस्वी होण्याचा माझा मानस आहे असे अनयने सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!