• Sat. Jun 7th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरात ढगफुटी, १५ मिनिटांत रस्त्यांना नदीचे स्वरूप

ByEditor

Jun 7, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
शनिवारी (दि. ७) दुपारी १ च्या सुमारास उरण शहरात तुफान पाऊस पडला. १५ मिनिटांच्या अंतरावर कोसळलेल्या या पावसात शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काही वाहने आडवी झाली.

या पावसात चालकांची एकच तारांबळ उडाली असून, गटाराचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानात उडाल्याने व्यावसायिकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यातील महिन्यात उरणची अवस्था कशी असणार आहे असा सवाल सध्या संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. तरी उरण नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!