• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जसखारच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या हेमलता ठाकूर विजयी

ByEditor

Jun 10, 2025

घन:श्याम कडू
उरण :
उरण तालुक्यातील प्रसिद्ध आणि आर्थिकदृष्ट्या बळकट मानल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना-भाजप युतीच्या हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि. ९ जून) झालेल्या बैठकीत हेमलता ठाकूर यांचा विजय निश्चित झाला. या विजयानंतर जसखार ग्रामपंचायतीत युतीचा दबदबा पुन्हा अधोरेखित झाला असून, या यशामागे उरणचे आमदार महेश बालदी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभल्याचे स्पष्ट दिसून आले.

या निवडणुकीचे ‘किंगमेकर’ म्हणून राकेश तांडेल आणि सचिन घरत यांनी निर्णायक भूमिका बजावली. त्यांचे कसब आणि नियोजन कौशल्य याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख दीपक ठाकूर, कामगार नेते सुरेश म्हात्रे, मनसे अध्यक्ष निशांत ठाकूर, माजी सरपंच नितीन पाटील, उपतालुकाप्रमुख अमित ठाकूर आणि ग्रामपंचायत सदस्य सीमा ठाकूर, वैजयंती ठाकूर, धनवंती ठाकूर, दमयंती म्हात्रे आदी उपस्थित होते. युवा सामाजिक संस्था अध्यक्ष हर्षल ठाकूर, खजिनदार मयूर तांडेल, रितेश म्हात्रे, शाखाप्रमुख मेघनाथ ठाकूर, रवी ठाकूर, योगेश म्हात्रे, बिट्टू आणि अनेक ग्रामस्थांनी नव्या उपसरपंचास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!