• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अमृत फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

ByEditor

Jun 18, 2025

प्रतिनिधी
अलिबाग :
अमृत फाऊंडेशनच्या वतीने आज एक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्याअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये आनिधन स्वच्छेने आलेल्या निधीचा उपयोग करण्यात आला.

या दिवशी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे फाऊंडेशनमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेले अक्षय म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या तर्फे सासवणे येथील मराठी शाळेत विद्यार्थ्यांना प्रिंटर व आवश्यक शालेय साहित्य भेट दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन अमृत फाऊंडेशनच्या मुख्य विश्वस्त सौ. अश्विनी धर्मेंद्र वर्तक यांच्या उपस्थितीत व अन्य सहकारी सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा हा एक सकारात्मक झोत ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!