• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दादर सागरी पोलिसांकडून घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत; ४.१० लाखांचा ऐवज जप्त

ByEditor

Jun 18, 2025

विनायक पाटील
पेण :
रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ते ९ जून २०२५ दरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आरोपीस अटक करून सुमारे ४.१० लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

खारपाडा येथील फिर्यादी सत्यजित सुरेश वाजपेयी यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली होती. यावरून भा.दं.वि. कलम ३३१(अ), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार अतिश पाटील आणि नंदन पाटील यांच्या प्रयत्नांतून आरोपी गुड्डू हरेराम सिंह (वय १९, रा. पकवलिया, उत्तर प्रदेश, सध्या राहणार हसुरामबुवा नेरुळकर यांची वाडी, खारपाडा-पेण) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ₹३,१५,००० किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ₹९०,००० किंमतीचा सोन्याचा नेकलेस, ₹१,००० किंमतीचा नेकलेस, ₹४,२०० रोख रक्कम असा एकूण ₹४,१०,२०० चा माल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईने गुन्ह्यातील १००% ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!