• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वरसोलीतील कॉटेजवर छापा, वेश्या व्यवसाय उघडकीस; एक महिला व एक पुरुष अटकेत

ByEditor

Jun 24, 2025

अमूलकुमार जैन
अलिबाग :
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग शहराच्या शेजारील वरसोली परिसरातील लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन आरोपींना अटक केली आहे.

२४ जून २०२४ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी छापा टाकून वरसोली परिसरातील लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराची माहिती मिळवल्यानंतर कारवाई केली. या प्रकरणात महिला आरोपी सप्या (५०, रा. ममता नगर, अलिबाग; मूळ रा. दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल) आणि राजेश रामलखन चौपल (२५, रा. घरभंगा) यांनी पीडित महिलेला व्यवसायासाठी प्रवृत्त करून पुरुष ग्राहकांना पुरवले असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या छाप्यात एकूण ₹२५,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा क्रमांक १११/२०१५ नुसार संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम १४३, ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!