• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वरवठणे गावातील शिवकालीन पूल बंद; ग्रामस्थांची खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडे धाव

ByEditor

Jun 25, 2025

प्रतिनिधी
नागोठणे :
रोहा तालुक्यातील वरवठणे गावालगतचा ऐतिहासिक शिवकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक बंद केल्याने स्थानिक रहिवाशांना विशेषतः महिला, विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी राज्यसभा खासदार व भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सविस्तर मांडल्या. ग्रामस्थांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून, खासदार धैर्यशील पाटील यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधत उपाययोजनांसाठी सूचना दिल्या.

त्यांच्या निर्देशांनुसार, सदर पूल चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवून, मात्र दुचाकी वाहनधारक व पादचाऱ्यांना वापरता येईल अशा स्वरूपात अंशतः खुला ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. खासदार धैर्यशील पाटील यांच्या निर्देशांमुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!