• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

ByEditor

Jun 27, 2025

चांदई येथील डॉ. एन. वाय. तासगावकर फिजिओथेरपी कॉलेज येथील घटना

अमूलकुमार जैन
रायगड :
कर्जत तालुक्यातील चांदई येथील डॉ. एन. वाय. तासगावकर फिजिओथेरपी कॉलेजच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला जातिवाचक अपमान करत मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अर्हंत मनोज लेंडाणे (वय २१) हे वसतिगृहात राहत असून, त्यांच्यावर दिनांक २ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास विजय ढोणे व इतरांनी बेसबॉल स्टिक व लोखंडी कड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर त्याला जी-३ रूममध्ये नेऊन पुन्हा एकदा “तुझी आमच्यासोबत बसायची लायकी नाही” आणि “तू डॉक्टर व्हायला आलायस?” अशा प्रकारचे जातिवाचक अपमानजनक शब्द वापरून धमकी देण्यात आली.

या प्रकारानंतर दिनांक २४ जून रोजी पुन्हा एकदा धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. यासंदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात दिनांक २६ जून रोजी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा क्रमांक १५९/२०२५ नुसार आरोपींवर भादंवि कलम ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५२ आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ चे कलम ३(१)(r)(s), ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम (खालापूर व अतिरिक्त कार्यभार कर्जत विभाग) करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!