मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मंगळवारी मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या भाजपच्या राज्य परिषद अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय व राज्यस्तरीय अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
कोकणात भाजपच्या विस्तारामध्ये रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. अर्थात ते केवळ कोकणपुरते मर्यादित नाहीत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘गाव ते जिल्हा’ अशा पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी चव्हाण यांच्या नेतृत्वाची साथ महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
