• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संशयास्पद ‘बोया’नंतर रायगडमध्ये २४x७ सुरक्षा कवच; हजारो हॉटेल्सची तपासणी

ByEditor

Jul 10, 2025

अलिबाग : रविवारी रात्री तटरक्षक दलाकडून रायगड किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. तपासाच्या अनुषंगाने हा ‘बोट’ नसून जीपीएस ट्रॅकरयुक्त ‘बोया’ असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, या घटनेनंतर सागरी सुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तीव्र ‘सर्च ऑपरेशन’ :

• जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील ३,००० हून अधिक काॅटेज आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
• अलिबाग व मुरुड तालुक्यात अनेक ठिकाणी शस्त्रधारी नाकेबंदी लागू.
• काही भागांत ‘स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले गेले.
• सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करत त्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश.

सायबर व सोशल मीडिया नियंत्रण :

• अफवांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांचा सोशल मीडिया सेल २४ तास कार्यरत.
• मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; संवाद व जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत.

वाहन आणि प्रवासी तपासणी :

• पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची चौकशी.
• मुंबईहून मांडवा मार्गे बोटीने येणाऱ्या प्रवाशांचे तपासणी.
• प्रमुख स्थानिक ठिकाणी २४ तास पोलिसांची गस्त सुरु.

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सुरक्षेचा दर्जा वाढवण्याची कार्यपद्धती स्पष्ट करत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!