सलीम शेख
माणगाव, ता. १५ जुलै : माणगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम माणगाव तहसील कार्यालयात पार पडला. या आरक्षणानुसार ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच आरक्षित करण्यात आले असून, ३७ ग्रामपंचायतींवर महिला नेतृत्व स्थापन होणार आहे.
आरक्षणाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले:
⏹ अनुसूचित जाती (खुला): निजामपूर, नागाव
⏹ अनुसूचित जाती (महिला): साई, विळे
⏹ अनुसूचित जमाती (खुला): मढेगाव, करंबेळी, पाणसई
⏹ अनुसूचित जमाती (महिला): साजे, पळसगाव, दाखणे, वडगाव
⏹ नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला): सणसवाडी, विहुले, रातवड, पन्हळघर बू, वरचीवाडी, चांदोरे, वणी मलईकोंड, फलाणी, हरकोल, देवळी
⏹ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): भागाड, चिंचवली, गांगवली, कडापे, भुवन, देगाव, शिरवली तर्फे निजामपूर, कुंभे, मांजरवणे, पोटनेर
⏹ सर्वसाधारण प्रवर्ग (खुला): तळाशेत, दहिवली त. गोवेले, पुरार, उणेगाव, कविळवहाळ बु., पहेल, टेमपाले, बामणोली, पन्हळघर खुर्द, भाले, सुरव त. तळे, निळज, होडगाव, शिरसाड, टोळखुर्द, साळवे, लोणेरे, वावेदिवाळी, मोर्बा, गोवेले, रवाळजे, वारक
⏹ सर्वसाधारण प्रवर्ग (महिला): वडवली, दहिवलीकोंड, पाटणूस, काकल, लोणशी, अंबले, तळेगाव त. गोरेगाव, पेण त. तळे, जिते, गोरेगाव, कुमशेत, कोस्ते खुर्द, पळसप, मांगरुळ, लाखपाले, नांदवी, खरवली, न्हावे, मुठवली त. तळे, डोंगरोली, साले
आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सरपंच पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात माणगाव तालुक्यातील ग्रामराजकारणात चुरस आणि तापलेली राजकीय हवा पाहायला मिळणार आहे.