क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग, ता. १६ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुढील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात महिलांसाठी प्रथमच क्रिकेट पंच प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन केले जात आहे. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात ही परीक्षा पार पडणार असून राज्य पातळीवर महिला पंचांची नियुक्ती करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महिलांसाठी क्रिकेट क्षेत्रात संधी
क्रिकेटमध्ये महिला पंचांना संधी मिळावी, यासाठी ही राज्यस्तरीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक आजी-माजी महिला खेळाडू, तसेच क्रिकेट जाणकार महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१८ जुलैपर्यंत इच्छुकांनी https://forms.gle/NY7oBwvkobyT4ukKA या लिंकवर ₹५९० नोंदणी शुल्क भरून नाव नोंदवावे, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने क्रिकेट-लॉ आधारित प्रशिक्षण कोर्स आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षेचे आयोजन होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक (९५६१०९९७३५), सदस्य ॲड. पंकज पंडित (८१४९२५२८२९), शंकर दळवी (९४२२५९४४१४१) यांच्याशी संपर्क साधावा.
