• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

द्रोणागिरी नोडमध्ये भरदिवसा घरफोडी; उरण तालुक्यात चोऱ्यांची मालिका, नागरिक संतप्त

ByEditor

Jul 16, 2025

घनःश्याम कडू
उरण :
रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ वाजता दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या ८०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने, एकूण ₹१४.४० लाखांची मालमत्ता लंपास केली.

ठाकूर दांपत्य कामावर व मुलगा शाळेत असताना घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही धाडसी कारवाई केली. चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र नेहमीसारखे ‘पुढील तपास सुरू आहे’ इतक्यावरच प्रतिक्रिया मर्यादित राहिली आहे.

द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या १५ दिवसांत घडलेली ही तिसरी चोरी असून, उरण शहरातही याच काळात दोन-तीन चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. तरीही पोलिसांना चोरट्यांचा ठावठिकाणा लावता आलेला नाही.

प्रशासनाकडून दुर्लक्ष या चोरीमागे उरण तालुक्यात अनधिकृतपणे भरत असलेल्या आठवडा बाजारांचे कनेक्शन असल्याचा नागरिकांचा संशय आहे. बाजारांतील गर्दीचा फायदा घेत संभाव्य रेकी करून चोऱ्या केल्या जात असल्याचे चित्र स्पष्ट आहे. नागरिकांकडून बाजार बंद करण्याची मागणी सातत्याने होत असून, पोलिस आणि प्रशासनाचे निष्क्रियपण जनता उघडपणे टीकासत्राने दर्शवत आहे.

“बाजार बंद करा, नाहीतर जनता रस्त्यावर येईल!” सुरक्षा व्यवस्था आणि तपास यंत्रणेमुळे असंतोष वाढत असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा याचे परिणाम अधिक गंभीर स्वरूप घेऊ शकतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!