अनेक मुस्लिम तरुणांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश
वैभव कळस
म्हसळा : शिवसेना सर्व जाती-धर्माचा आदर बाळगते. समाजातील सर्व घटकांचा विकास हाच या पक्षाचा ध्यास असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवसेनेचे विचार पटत असल्याने मुस्लिम समाजातील युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने आगामी निवडणुकीत श्रीवर्धन मतदार संघात बदल निश्चित होणार असा ठाम विश्वास शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आगरी समाज मंदिर येथे पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात बोलून दाखवला. यावेळी असंख्य मुस्लिम तरुणांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुक मी स्वतः लढावी असा पक्षाचा आदेश आहे. जर तुमची साथ असेल तर मी निवडणूक लढवणार असल्याचे नवगणे यांनी जाहीर केले.आगामी पंचायत समिती आणि जिल्हापरिषद निवडणुकीत सुद्धा आपल्याला यश मिळणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, क्षेत्र संघटक रवींद्र लाड, श्रीवर्धन मतदार संघ संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, उप तालुकाप्रमुख राजाराम तीलटकर, भाई कांबळे, बाळा म्हात्रे, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित महामुनकर, तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, रीमा महामुनकर, निशा पाटील, नगरसेविका राखी करंबे, अजय करंबे, राहुल जैन, अल्पसंख्याक अध्यक्ष हजवाने, दिपल शिर्के आणी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
शहर प्रमुख अनिकेत पानसरे यांनी अथक प्रयत्न करून अनेक मुस्लिम तरुणांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. माजी नगरसेवक सुभान हळदे, सामाजिक कार्यकर्ते नदीम दफेदार, सर्फराज वस्ता, फैसल पठाण, सज्जाद शेख, इरफान शेख, हानिफ जमादार, बाबा नाटेकर, झाकीर फणसे, नईम टोलकर, रियाज तळकर, अबुशमा हलदे, तौसिफ फक्की, अब्दुल शकुर हुर्जुक, आखलाक काठेवाडी यांच्या समवेत असंख्य मुस्लिम तरुणांनि शिवसेनेत प्रवेश केला.