• Tue. Jul 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबईसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

ByEditor

Jul 21, 2025

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, कालपासून सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दुबार पेरणीचे संकटात अडलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने धीर दिला आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाने दडी मारली होती. मात्र आता पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे, या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

पालघर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ 21 जुलै 2025 रोजी हलका पाऊस, हलका ते मध्यम पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह हलका/मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!