आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या महिन्याची सुरूवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते. यावर्षी आषाढ अमावस्या आज साजरी केली जाणार आहे. यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.
दीप अमावस्येचं महत्त्व
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते.
दीप अमावस्या २०२५ – शुभ मुहूर्त आणि माहिती:
तारीख: बुधवार, २३ जुलै २०२५
अमावास्या तिथी सुरू: २२ जुलै २०२५, उत्तर रात्री २:२८ वाजता
अमावास्या तिथी समाप्त: २३ जुलै २०२५, उत्तर रात्री १२:४० वाजता
दीप पूजनासाठी शुभ मुहूर्त (कालावधी):
शुभ वेळ: २३ जुलै २०२५, सायं. ६:३० ते रात्री ८:३०
विशेष पूजन मुहूर्त: सायं. ७:०० ते ८:०० (संध्याकाळी सूर्योदयानंतरचा काळ – प्रदोषकाल)
‘अशी’ साजरी करा दीप अमावस्या
दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने प्रज्वलित करा. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.
‘या’ मंत्राचा जप करा
पूजा झाल्यानंतर ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’, या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.