• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण एसटी डेपोचा गलथान कारभार

ByEditor

Aug 10, 2023

वैशाली कडू
उरण :
उरण एसटी डेपोचा गलथान कारभार सुरू आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे. तरी एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केला आहे.

उरण एसटी डेपोतून सकाळी सुटणाऱ्या बस या अनियमित असतात. तसेच डेपोतील कंट्रोल रूमही बंद अवस्थेत असते. त्यामुळे शिक्षणासाठी सकाळच्या वेळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून नाराजीचा सुरू निघत आहे. प्रवास सुखकर व कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यासाठी विद्यार्थी सकाळी ५.३० वाजल्यापासून बंद डेपोत बसची वाट पहात असतात. परंतु बस ६ वाजल्यानंतर येतात तर कधी कधी बसच येत नाही. याची कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी वाहतूक नियंत्रक उपस्थित नसतो. यामुळे कधी कधी कॉलेजला दांडी होत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर कॉलेजला पोहचण्यासाठी गाड्या वेळेवर लावून आपला गलथान कारभार डेपोनी सुधारावा अन्यथा या विरोधात विद्यार्थी परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तरी डेपो मॅनेजरने याकडे लक्ष देऊन गलथान कारभार सुधारावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!