२८ जुलैपासून अंमलबजावणी
मुंबई, २५ जुलै : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना अतिरिक्त व्यावसायिक थांबे मंजूर केल्याचे अधिसूचना क्रमांक ६० / २०२५-२६ द्वारे जाहीर केले आहे. ही अंमलबजावणी २८ जुलै २०२५ पासून होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार (Ref: No.2023/CHG/13/13 dated 25/07/2025), खालील गाड्यांना पुढील स्थानकांवर पावसाळी वेळापत्रकानुसार थांबा देण्यात येणार आहे:
गाडी क्र. मार्ग नवीन थांबा वेळ (पावसाळी)
10106 सावंतवाडी – दिवा कोलाड (KOL) 16:29 / 16:30
10105 दिवा – सावंतवाडी कोलाड (KOL) 09:16 / 09:17
10106 सावंतवाडी – दिवा अंजनी (ANO) 14:05 / 14:06
10105 दिवा – सावंतवाडी अंजनी (ANO) 11:19 / 11:20
10107 मडगाव – मंगळूरू शिरूर (SHMI) 08:22 / 08:23
10108 मंगळूरू – मडगाव शिरूर (SHMI) 18:17 / 18:18
10107 मडगाव – मंगळूरू पदुबिद्री (PDD) 10:19 / 10:20
10108 मंगळूरू – मडगाव पदुबिद्री (PDD) 16:57 / 16:58
हिवाळी व उन्हाळी वेळापत्रक नंतर प्रसिद्ध केले जाणार आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची भर पडणार आहे.
