पनवेल, दि. ५ (प्रतिनिधी):
हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना – वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा ५ ते ८ ऑगस्टदरम्यान दररोज रात्री पूर्णपणे बंद राहणार आहे. वाशी स्थानकात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामामुळे हा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधीत दररोज रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत वाशी स्थानकात अप व डाउन मार्गावर विशेष ब्लॉक असेल. त्यामुळे वाशी-पनवेल दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल सेवा पूर्णतः बंद असतील. यासोबतच काही लोकल सेवा कमी अंतरावरच थांबवण्यात येणार आहेत आणि काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉकमुळे प्रभावित होणाऱ्या प्रमुख लोकल सेवा पुढीलप्रमाणे:
🔹 वाशी–पनवेल:
सर्व लोकल सेवा रद्द
🔹 बेलापूर–CSMT लोकल:
रात्री ८:५४ ची लोकल वाशीपर्यंत
रात्री ९:१६ ची लोकल वडाळा रोडपर्यंत
🔹 वांद्रे–CSMT लोकल:
रात्री १०:०० वाजता सुरू होणारी लोकल वडाळा रोडवरच थांबवण्यात येईल
🔹 पनवेल–वाशी लोकल:
रात्री १०:५५ आणि ११:३२ वाजता सुटणाऱ्या लोकल नेरुळपर्यंतच धावतील
🔹 वाशीहून सुटणाऱ्या पहाटेच्या अप लोकल सेवा (रद्द):
५ आणि ६ ऑगस्ट: 4:03, 4:15, 4:25, 4:37, 4:50 आणि 5:04
७ आणि ८ ऑगस्ट: 4:03 आणि 4:25
🔹 CSMTहून वाशीकडे येणाऱ्या डाउन लोकल सेवा (रद्द):
रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 या वेळेच्या लोकल
प्रवाशांसाठी सूचना:
रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे प्रवासात बदल होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक काळजीपूर्वक पाहावे, अन्यथा गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याचा सल्लाही दिला जात आहे.