• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय

ByEditor

Aug 13, 2025

३१ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार

घनश्याम कडू
उरण :
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या आरकेएफ विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू केलेले आमरण उपोषण, JNPA चेअरमन उन्मेश वाघ यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे १२ ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधी (PF): जून २०१९ पासून प्रलंबित देणी दोन दिवसांत अदा करण्याची हमी,
करारबद्ध कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीकरण: पात्रता व अनुभवानुसार वेतन वाढीसाठी समिती; २० ऑगस्ट २०२५ रोजीच्या मंडळ बैठकीत मंजुरी,
थकबाकी देणी: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकूण ₹६४ लाखांची थकबाकी लवकरच अदा करण्यास सहमती,
६वा व ७वा वेतन आयोग: ३१ ऑगस्टपूर्वी अंमलबजावणीसाठी सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश,
विद्यालयाचे व्यवस्थापन: आरकेएफ विद्यालयाचे व्यवस्थापन रद्द करून पुढील १० वर्षे JNPAकडे ठेवण्याचा निर्णय; सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आदी मागण्याचा समावेश आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीस JNPA चेअरमन उन्मेश वाघ, उपाध्यक्ष अनिरुद्ध जोशी, व्यवस्थापक (प्रशासन) विनय मल्ह, सचिव मनीषा जाधव, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, JNPA माजी विश्वस्त व कामगार नेते भूषण पाटील, तसेच शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांची दहा सदस्यीय कोर कमिटी उपस्थित होती.

“३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व मागण्यांवर ठोस कारवाई झाली नाही, तर स्थगित आंदोलन पुन्हा सुरू होईल.” असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!