मुंबई : मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी 10 थर लावणार का याकडे लक्ष असताना कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून विश्वविक्रम केला आहे. हा थरार अनुभव ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी सोहळ्यात पाहिला मिळाला.