मुंबई : बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती, मात्र निकालात त्यांचा पत्ता साफ झाला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पराभव दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
या निवडणुकीत शिवसेना (UBT) कडून 19 तर मनसेकडून 2 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, दोन्ही पक्षांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. याउलट, शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने जोरदार कामगिरी करत एकहाती सत्ता काबीज केली.
कोणाला किती जागा?
- बेस्ट वर्कर्स युनियन (शशांक राव) – 14 जागा
- भाजप – 4 जागा
- शिंदे गटाची शिवसेना – 2 जागा
- SC-ST युनियन – 1 जागा
भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या आखलेल्या रणनीतीसह शशांक राव यांच्या संघटनेची पकड निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.
विजयी उमेदवारांची यादी
शशांक राव पॅनल (एकूण 14)
- आंबेकर मिलिंद शामराव
- आंब्रे संजय तुकाराम
- जाधव प्रकाश प्रताप
- जाधव शिवाजी विठ्ठलराव
- अम्मुंडकर शशिकांत शांताराम
- खरमाटे शिवाजी विश्वनाथ
- भिसे उज्वल मधुकर
- धेंडे मधुसूदन विठ्ठल
- कोरे नितीन गजानन
- किरात संदीप अशोक
महिला राखीव – डोंगरे भाग्यश्री रतन
अनुसूचित जाती/ जमाती – धोंगडे प्रभाकर खंडू
भटक्या विमुक्त जाती – चांगण किरण रावसाहेब
इतर मागासवर्गीय – शिंदे दत्तात्रय बाबुराव
प्रसाद लाड पॅनल (एकूण 7)
- रामचंद्र बागवे
- संतोष बेंद्रे
- संतोष चतुर
- राजेंद्र गोरे
- विजयकुमार कानडे
- रोहित केणी
महिला राखीव – रोहिणी बाईत
एकूण 21 जागांवर विजय मिळवून शशांक राव गटाने बेस्ट पतपेढीवर आपले वर्चस्व सिद्ध केले असून, ठाकरे गोटाचा हा पराभव आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या रणनीतीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
